बंगालमधे मालदा येथे भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या!

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
मालदा,
malda-bjp-worker-samir-ghosh-murderबंगालमधील मालदा जिल्ह्यात दशमीच्या दिवशी एका भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला ठार करण्यात आले. या हल्ल्यात चार गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना इंग्लिशबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत कार्यकर्त्याचे नाव २७ वर्षीय समीर घोष असे आहे.
 

ghosh 
भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि केंद्रीय दल तैनात करण्यात आले आहेत.
 
मृताच्या कुटुंबीयांनी या हत्येमागे तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. मृताचा भाऊ, विवेक घोष याने आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, समीरचे वडील लालचंद यांच्यावर २०२५ मध्ये सुबल घोष नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप होता. आता सुबलचा नातेवाईक शत्रु घोष याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 
एका जुन्या वादाशी असलेल्या संभाव्य संबंधांचाही पोलीस तपास करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुपम सिंह यांनी सांगितले की, राजन घोष नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत.