थोडक्यात वाचला महिला पोलिस कर्मचाऱ्याचा जीव

भरधाव वाहनाच्या धडकेत महिला पोलिस जखमी

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
Nagpur Accident दुचाकीने जात असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. या अपघातात महिला पोलिसाच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर जखमी महिलेला मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी घडली. बलजीत कौर (२९) असे जखमी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्या हिंगणा पोलिस ठाण्यात नियुक्त आहेत.
 

Nagpur Accident Woman Police Constable Fractures Leg After Vehicle Hit-and-Rungnj 
 
 
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, शासकीय पत्रव्यवहार पोहोचविण्यासाठी पोलिस कर्मचारी बलजीत कौर या शासकीय वाहनाने (एमएच ३१ एफव्ही १६९९) जात होत्या. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोपेडला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बलजीत कौर रस्त्यावर पडल्या. त्यांच्या उजव्या पायाला गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर वाहनचालक थांबला नाही, तर जखमी महिलेला मदत न करताच घटनास्थळावरून पळून गेला. जखमी बलजीत कौर यांना वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.