शप गटातून कराळे मास्तर सहा वर्षांसाठी निलंबित

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
 
वर्धा, 
nitesh-karale-suspended-ncpनागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने येथील नितेश कराळे मास्तर यांच्यावर कारवाई केली आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र शप गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी आज गुरुवार २२ रोजी जारी केले आहे.
 
master
 
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचीही जबाबदारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, पक्षाच्या धोरणात्मक भूमिकेला विरोध करून कराळे मास्तर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी काम करणे अपेक्षित होते. असे असताना पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे पक्षशिस्त आणि धोरणांचे उल्लंघन झाल्याचे प्रदेश सरचिटणीसांनी म्हटले आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार नितेश कराळे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे