सावधान...तुम्हालासुद्धा बँक अधिकारी असल्याचे सांगून फोन आला का?

बँक अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठाला ८ लाखांचा गंडा

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |

अनिल कांबळे

नागपूर, 
senior citizen swindled बँक ऑफ इंडियाचा प्रतिनिधी असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून तब्बल ८ लाख रुपये परस्पर काढून घेतले. व्यंकटराव कृष्णाजी ब्राह्मणकर (७९), रा. हेरिटेज ए बिल्डिंग, अथर्व नगरी-२, पिपळा रोड, बेसा असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.
 
 
 
senior citizen swindled
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राह्मणकर यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण बँक ऑफ इंडियाचा प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून त्यांच्या बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून आरोपीने ब्राह्मणकर यांच्या खात्यातून त्यांच्या ऑनलाइन व्यवहार केले.senior citizen swindled या व्यवहारांतून खात्यातील ८ लाख रुपये काढून घेण्यात आले. खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर ब्राह्मणकर यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविणे, पैशांच्या व्यवहारांचा माग काढणे आणि फसवणुकीची रक्कम परत मिळविण्याच्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.