सोयाबीनच्या गंजीला आग ; ३ लाखांचे नुकसान

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
soybean-stack-catches-fire तालुयातील पिंपळगाव इजारा येथे सोयाबीनच्या गंजीला आग लागून सुमारे ३० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. या घटनेत शेतकरी गजानन शिवराम राठोड यांचे ३ लाखावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गजानन राठोड यांनी यंदा सहा एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. कापणीनंतर पीक गोळा करून शेतातच गंजी रचून ठेवण्यात आली.
 
 
soybean-stack-catches-fire
 
त्यापासून एकरी पाच क्विंटल याप्रमाणे साधारणतः ३० क्विंटल सोयाबीन घरात येईल, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती. परंतु २० ऑटोबरच्या रात्री अचानक लागलेल्या आगीमुळे साठवून ठेवलेले पीक जळून खाक झाले. यांसंदर्भात माहिती मिळताच कृषी सहायक सचिन दंडे, तलाठी प्रदीप देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. पंचनाम्यानुसार नुकसान ३ लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यातही देण्यात आली आहे.