शिक्षक मतदारसंघासाठी बुलढाणा जिल्ह्यात ९०.७५ टक्के मतदान

सर्वाधिक मतदान मोताळा केंद्रावर ९६.८७ टक्के सर्वात कमी लोणार ७३.१४ टक्के

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
बुलढाणा
voter-turnout अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया बॅलेट पेेपरवर पार पडली. पोलिसांचा चोख बंदोबस्त केंद्र परिसरात ठेवण्यात आला होता. भ्रमणध्वनी केंद्रात प्रवेश करण्यास मनाई होती. दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून तर दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ९ हजार १२४ मतदारांपैकी ८ हजार २८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष ६हजार ८५ तर महिला २ हजार १९५ असे एकूण सरासरी ९०.७५ टक्के मतदान झाले आहे.
 
buldhana
मतदान केंद्र निहाय झालेले एकूण मतदान पूढीलप्रमाणे आहे. मतदान केंद्र क्रमांक ३९ जळगाव जमोद ४९७ मतदार पैकी झालेले मतदान ४६२ टक्केवारी (९२.९६) टक्के, मतदान केंद्र क्र. ४० संग्रामपूर १८० पैकी मतदान १७२ (९५.५६), क्रमांक ४१ मलकापूर ६६३ पैकी मतदान ५९४ (९५.३५), क्रमांक ४२ नादूंरा ४०२ पैकी ३८४ (९५.५२), क्रमांक ४३ मोताळा ३५१ पैकी ३४० (९६.८७), क्रमांक ४४ शेगाव ६४० पैकी ५६६ (८८.४४), क्रमांक ४५ खामगांव ४६४ पैकी ४२७ (९२.०३) क्रमांक ४६ खामगांव ४६३ पैकी ४१९ (९०.५०), क्रमांक ४७ चिखली ६०० पैकी ५२८ (८८) क्र. ४८ चिखली ४८० पैकी ३५५ (७३.९६) क्र ४९ बुलढाणा ६०० पैकी ५५६ (९२.६७) क्र. ५० बुलढाणा ६०० पैकी ५६१ (९३.५०), क्र.५१ बुलढाणा ५९८ पैकी ५५०(९१.९७) क्र. ५२ देऊळगावराजा ४३९ पैकी ४२३ (९६.३६), क्र. ५३ सिंदखेडराजा ५८१ पैकी ५४३(९३.६४), क्र ५४ मेहकर ५२०पैकी ४८७ (९३.६५) क्र.५५ मेहकर ५२० पैकी ४९९ (९५.९६), क्र. ५६ लोणार ५६६ पैकी ४१४(७३.१४) एकूण ९ हजार १२४ मतदारांपैकी ८ हजार २८० मतदारांनी मतदान केले. एकूण सरासरी ९०.७५ टक्के मतदान झाले. महत्तवाच्या लढतीमध्ये विद्यमान आमदार शिवसेना (शिंदे गट) शिवसेनेकडून किरण सरनाईक, काँग्रेसकडून आदिती पोहरे, शिक्षक भारतीचे सुरेश देवकर, शिवसेना उबाठाचे दत्तात्रय लहाने भाजप बंडखोर डॉ. संगीता शिंदे (बोंडे)यांच्यामध्ये शिक्षक आघाडीचे डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्यात मुख्य लढत झाल्याचे दिसून येते. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक उमेदवारांना जिल्ह्यातील शिक्षकांनी भरभरून मतदान दिल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सामाजिक दृष्टया तसेच शिक्षक संघटनेच्या कार्यानुसार होणारे मत विभाजन यातून येत्या मंगळवारी २७ ऑटोबर रोजी मतमोजणीतून निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.