नागपूर,
Ashok Mankar's wife passes away श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्या आणि माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष अशोक मानकर यांच्या पत्नी प्रगती मानकर यांचे शुक्रवारी, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मानकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या परिवारातही शोक व्यक्त केला जात आहे.
प्रगती मानकर या श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्या म्हणून संस्थेशी जोडलेल्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतकांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने संस्थेच्या परिवारातील एक महत्त्वाची व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगी श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने दिवंगत प्रगती मानकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.