चंद्रपूर जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी 42.52 टक्के मतदान

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर
chandrapur voter-turnou नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 42.52 टक्के मतदान झाले. शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून जिल्ह्यातील 58 केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली. संथगतीने मतदान पुढे जात राहिले.

chanda 
या निवडणूकीत भाजपाचे सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजीत वंजारी, अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्यासह 38 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले. जिल्ह्यात 20 हजार 905 पुरूष, 11 हजार 357 स्त्री असे एकूण 32 हजार 262 पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी अंदाजे पुरूष, स्त्री आदी मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. ब्रम्हपुरी येथे 11, वरोडा 9, चंद्रपूर 8, मूल 7, तर चिमूर, बल्लारपूर, राजुरा प्रत्येकी 6, कोरपना 5 अशा 58 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी या मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होत्या.
 
 
जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 8.52 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 23.07 टक्के, दुपारी 2 वाजेपर्यंत 42.52 टक्के, तर 4 वाजेपर्यंत सरासरी टक्के मतदान झाले. दुपारी 4 वाजपर्यंत पोंभुर्णा तालुक्यात 73 टक्के, गोंडपिपरी 78.65 टक्के, मूल 74.58 टक्के, चिमूर 75.83 टक्के, नागभीड 78.47 टक्के, बल्लारपूर तालुक्यात 73 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
...तर मतपत्रिका फाटली म्हणून अवैध ठरवू नका : आ. मुनगंटीवार
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत 38 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदान पत्रिकेची घडी एवढी जाड हात होती की, मतदान बजावल्यानंतर ती मतपत्रिका मतपेटीतील लहानश्या छिद्रात सहज जात नव्हती. टाकताना ती फाटण्याची शक्यता होती. अशा कारणाने कोणतीही मतपत्रिका फाटली तर ती निवडणूक आयोगाने अवैध ठरवू नये. कारण ही चूक मतदाराची नाही. आचारसंहितेचे कारण देत दुष्काळी प्रश्नांवर बैठक घेऊ न देणार्‍या निवडणूक आयुक्तांनी मतपेटीच्या छिद्राचा आणि मतपत्रिकेच्या जाडीचा कोणताही विचार केला नाही, असा खंत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरातील एफईएस महाविद्यालयात मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

वरोड्यात मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा
वरोडा शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. या ठिकाणी एकूण 5 मतदान केंद्रे देण्यात आले होते. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतदानासाठी सुरुवातीला फारसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. परंतु, दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर मतदार आल्याने दुपारी 4 वाजेपर्यंत मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. जाड जुड मतपत्रिकेची घडी करायलाही कर्मचार्‍यांना बराच वेळ लागत होता. त्यामुळेही मतदान उशिरापर्यंत चालले. यावेळी आमदार करण देवतळे व त्यांच्या पत्नी वेदांती देवतळे तसेच नागराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.