तिबेटमध्ये २४ तासांत ४० वेळा धरती हादरली!

तिबेटपासून पाकिस्तानपर्यंत भूकंपांचे धक्के

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
काठमांडू,
tremors-from-tibet-to-pakistan तिबेटपासून पाकिस्तानपर्यंत अनेक देशांमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भारत, तिबेट, चीन, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये भूकंपाच्या विविध तीव्रतेच्या हालचाली नोंदवण्यात आल्या. संबंधित वृत्तानुसार, २४ तासांत सुमारे ४० वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये तिबेटमध्ये सर्वाधिक तीव्रतेचा, म्हणजे ७ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. या भूकंपांमुळे काही भागांत जीवितहानी झाल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मात्र, मृतांची नेमकी संख्या आणि सर्व घटनांची अधिकृत एकत्रित आकडेवारी उपलब्ध नसल्याने परिस्थितीचे संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही.
 
tremors-from-tibet-to-pakistan
 
भारतात नागालँड, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या भागांमध्ये भूकंपाच्या हालचाली नोंदवण्यात आल्या. २१ ऑक्टोबरच्या रात्री १ वाजता नागालँडमध्ये ३.६ तीव्रतेचा भूकंप झाला. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजून २ मिनिटांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे २.९ तीव्रतेचे धक्के नोंदवण्यात आले. त्यानंतर २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजून ३८ मिनिटांनी हिमाचल प्रदेशातील चंबा येथे २.३ तीव्रतेचा, तर पहाटे २ वाजून ४३ मिनिटांनी शिमला येथे २.७ तीव्रतेचा भूकंप झाला. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून १ मिनिटांनी बंगळुरूमध्ये ३ तीव्रतेचे धक्के नोंदवण्यात आले. भारताच्या शेजारील अफगाणिस्तानमध्येही २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ३ वाजता ३.५ तीव्रतेचा भूकंप झाला. त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी ४.७ तीव्रतेचे धक्के बसले. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी अफगाणिस्तानमध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. नेपाळमध्ये २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून २४ मिनिटांनी ३.२ तीव्रतेचे धक्के जाणवले, तर पाकिस्तानमध्ये २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी ४.९ तीव्रतेचा भूकंप झाला.
 
या घटनांमध्ये तिबेटमधील भूकंपांची मालिका विशेष लक्षवेधी ठरली. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी तिबेटमध्ये ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी ७ तीव्रतेचा मोठा धक्का बसला. रात्री ८ वाजून ४२ मिनिटे, ९ वाजून ९ मिनिटे आणि ९ वाजून २७ मिनिटांनी प्रत्येकी ५ तीव्रतेचे धक्के नोंदवण्यात आले. रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी ४.८, ९ वाजून ५१ मिनिटांनी ४.६ आणि रात्री १० वाजून २० मिनिटे, १० वाजून २८ मिनिटे व १० वाजून ४० मिनिटांनी ४.७ तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले. रात्री ११ वाजून १७ मिनिटांनी ४.३, ११ वाजून ३६ मिनिटांनी ४.८ आणि ११ वाजून ५५ मिनिटांनी ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला. २३ ऑक्टोबरलाही ही मालिका सुरू राहिली.
 
 
मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांनी ४.३, सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी ४.२, ५ वाजून ५४ मिनिटांनी ४.४, ६ वाजून १९ मिनिटांनी ३.९, ७ वाजून ४६ मिनिटांनी ४, ८ वाजून २३ मिनिटांनी ४.६, ८ वाजून ४३ मिनिटांनी ४.१ आणि दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी ४ तीव्रतेचे धक्के नोंदवण्यात आले. चीनमध्येही २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी ५.२, ९ वाजून २७ मिनिटांनी ५ आणि रात्री १० वाजून १५ मिनिटांनी ४.९ तीव्रतेचे भूकंप झाले. २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी ४.३, पहाटे २ वाजून ६ मिनिटांनी ४.५ आणि सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी ४.४ तीव्रतेचे धक्के नोंदवण्यात आले. म्यानमारमध्ये २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ५१ मिनिटांनी ३.५, पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी ३.३ आणि सकाळी ११ वाजून १८ मिनिटांनी ४ तीव्रतेचा भूकंप झाला. अनेक देशांमध्ये एकाच कालावधीत भूकंपाच्या वारंवार हालचाली नोंदवल्या गेल्याने या घटनांकडे लक्ष वेधले गेले आहे.