अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा 'हा' मोठा निर्णय

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
मुंबई,
maharashtra-agniveer-jobsराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्निवीरांना शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण मिळणार आहे.
 

agniveer 
नियमांमध्ये आवश्यक ते बदल करून आता 282 अग्निवीरांना नियुक्ती देण्यास मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचे आदिवासी असलेल्या 282 नौदल अग्निवीरांची पहिली यादी राज्य सरकारला प्राप्त झाली होती. त्यानुसार, 150 खलाशी डेकसाईड आणि 132 खलाशी इंजिनसाईड अशा एकूण 282 अग्निवीरांना पोलीस शिपाई म्हणून थेट नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती आदेशांचे वितरणही करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अग्निवीरांना त्यांच्या देशसेवेनंतर राज्यात रोजगाराची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व अग्निवीरांना त्यांच्या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.