वर्धा,
arvi murdered जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी २१ वर्षीय तरुणाला चाकू व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खुन करण्यात आला. ही घटना आर्वी येथील वाल्मिक वार्डात गुरुवार २२ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. अभिजीत ढोकणे (२१) रा. पिंपळा पुनर्वसन असे मृताचे नाव आहे. आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रथमेश हायगले (२२), विशाल नीपाणे (२५) व सुभाष देवबाआप्पा (५२) या तिघांना अटक केली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत ढोकणे व सुभाष देवबाआप्पा यांच्यात जुना वाद होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी वाल्मिक वॉर्ड परिसरातील ओट्यावर बसून असलेल्या अभिजितला तिघांनी चाकू व लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाण करताना अभिजितच्या गळ्यावर चाकूने तर लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार केल्याने अभिजितचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठले.arvi murdered पोलिसांनी अभिजितला आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
आरोपीबाबत पुरावे जमा करण्यासाठी फॉरेन्सिकच्या चमूलाही पाचारण करण्यात आले होते. या घटनेची आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून गुुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हारी तळीकोटे करीत आहेत.