वाशीम,
save-farming-campaign-in-shendurjana शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेती अधिक शाश्वत व फायदेशीर बनविण्यासह नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविण्याच्या उद्देशाने शेंदूरजना येथे आत्मा व कृषी विभागाच्या वतीने ‘शेती बचाओ’ अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. एल. काळे यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, नैसर्गिक निविष्ठांचा वापर, जमिनीचे आरोग्य जपण्याच्या उपाययोजना आणि शेतीपूरक जोडधंद्यांबाबत मार्गदर्शन केले. तालुका पशुसंवर्धन अधिकारी गणेश वनाळे यांनी पशुपालनाचे महत्त्व, पशुधन व्यवस्थापन आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुपालनाची भूमिका स्पष्ट केली.

सहाय्यक शुभम पाचपिल्ले यांनी अभियानाचे प्रास्ताविक केले, तर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संजय राऊत यांनी ‘शेती बचाओ अभियाना’ची उद्दिष्टे स्पष्ट करून शेतकर्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. मास्टर ट्रेनर शंकर शिंदे यांनी गळीत धान्य पिकांचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, पीक अवशेषांपासून कंपोस्ट खतनिर्मिती आणि सोयाबीनचे बियाणे राखीव ठेवण्याबाबत माहिती दिली.
आत्मा योजनेचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप मोरे यांनी फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे सांगितले. फार्मर आयडीमुळे शेतकर्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होऊन विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहितीची पडताळणी सुलभ होते. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियोजित शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक गजानन गोटे यांनी केले. यावेळी कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अनुप पाटील, हरिभाऊ ठाकरे, संजय गावंडे आणि गणेशराव काळे उपस्थित होते. या प्रशिक्षणातून नैसर्गिक शेती, पशुपालन, गळीत धान्य पिकांचे व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर, फार्मर आयडी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सामूहिक विकास याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.