शिक्षक निवडणुकीसाठी ९१.८ टक्के मतदान

१० टक्क्याने वाढले मतदान,मंगळवारी अमरावतीत मतमाेजणी

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
अमरावती
teachers-constituency-election विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत शांततेत सरासरी ९१.८ टक्के मतदान झाले. गत निवडणुकीच्या तुलनेत ते १० टक्क्याने वाढले आहे. सर्वाधिक मतदान वाशीम जिल्ह्यात ९२.८७ टक्के झाले. एकूण २६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या भाग्याचा फैसल मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
 
 
amra
 
निवडणुकीसाठी विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम या पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. एकूण ३५ हजार ८१० मतदार शिक्षकांपैकी जवळपास ३२ हजार ५१५ शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. एका मतदान केंद्रावर ५ याप्रमाणे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. अमरावती शहरात गर्ल्स हायस्कूल चाैकात जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांचे बुथ हाेते. त्यामुळे समर्थकांची व नेत्यांची चांगली गर्दी होती. दुपारी १२ पर्यंत सरासरी ३६.२४ टक्के, दुपारी २ वाजेपर्यंत ६२.५४ टक्के मतदान झाले होते. मतदाराच्या अंतिम वेळेपर्यंत ९१.८ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १० टक्क्याने मतदान वाढले आहे.
 
२६ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत
निवणुकीच्या रिंगणात किरण सरनाईक (शिवसेना), अदिती पोहरे (काँग्रेस), दत्तात्रय लहाने (शिवसेना उबाठा), सुरेश देवकर (शिक्षक भारती), श्रीकांत देशपांडे, संगीता शिंदे (मराशीप), चंद्रशेखर भोयर, दिलीप कडू यांच्यासह १८ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. चर्चा आणि दावे वेगवेगळे आहेत. लढत पंचरंगी झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यापर्यंतची वेळ येऊ शकते, इतकी ही निवडणूक चुरशीची झाली आहे.
जिल्हानिहाय मतदान

अमरावती - ८९.३६ टक्के
अकोला - ९२.१२ टक्के
यवतमाळ - ९२.१७ टक्के
बुलढाणा - ९०.७५ टक्के
वाशीम - ९२.८७ टक्के