कारंजा लाड,
ballot-box अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑटोबर रोजी मतदान पार पडले , या निवडणुकीकडे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले होते . शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आणि शिक्षकांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार निवडण्यासाठी शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . कारंजा तालुयातील १९८ महिला आणि ४९६ असे ६९४ शिक्षक मतदारांसाठी तहसील कार्यालयातील खोली क्रमांक पाच (निवडणूक विभाग) येथे मतदानाची व्यवस्था आली होती . या निवडणुकीत ६९४ पैकी ६५२ म्हणजेच ९३.९४ टक्के शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य पसंती क्रमाने मतदान करून मतपेटीत बंद केले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विद्यमान आमदार किरण सरनाईक, किरण चौधरी, चंद्रशेखर भोयर, दिलीप कडू, संगीता शिंदे-बोंडे, श्रीकांत देशपांडे, प्रा. आदिती पोहरे, प्रा. अविनाश बोर्डे, प्रा. विधे, प्रा. दत्तात्रय लहाने, सुरेश देवकर आणि उपेंद्र पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांचा यात समावेश आहे.या निवडणुकीत शिक्षक मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. विविध उमेदवारांनी शिक्षकांशी संपर्क साधून आपापल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
कारंजा तालुयात ४९६ पुरुष आणि १९८ महिला असे एकूण ६९४ शिक्षक मतदार आहेत. या सर्व मतदारांना मतदान करता यावे, यासाठी तहसील कार्यालयात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती .मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने नियोजन केले . मतदान केंद्रावर प्रोसिडिंग ऑफिसरसह पाच कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पाच कर्मचार्यांचे राखीव पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. विभागीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी किती राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते . कारंजा तालुयात ९३.९४ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतमोजणीतून होणार आहे. शिक्षकांचे प्रश्न, सेवा-सुविधा, शैक्षणिक धोरणे आणि शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे निकालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे मतदानापासून निकालापर्यंतच्या घडामोडींकडे उमेदवारांसह शिक्षकांचेही लक्ष लागले आहे.