तस्करांनी दहशतवाद्यांना पुरवला ७६ काेटींचा निधी

दिल्ली, पंजाब आणि हरयाणातून अमली पदार्थ जप्त

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ed-arrests-baneet-singh-talwarअंमलबजावणी संचालनालयाच्या मुख्यालयाने अमली पदार्थ तस्कर बनीत सिंग तलवारला बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायदा, २००२ च्या तरतुदींनुसार अटक केली. सेमी-प्रोसेस्ड टाल्कमध्ये लपवलेल्या अमली पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील तस्करीच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली. दिल्ली, पंजाब आणि हरयाणा येथेही अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आराेपीला तीस हजारी न्यायालयातील विशेष न्यायाधीशांनी पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

ED 
 
एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीचा तपास सुरू करण्यात आला. हा एफआयआर हरप्रीत सिंग तलवार आणि इतरांविरुद्ध अमली पदार्थांच्या तस्करीच्या कारवायांच्या संबंधात यूएपीए, एनडीपीएस कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली नोंदवण्यात आला होता. एनआयएने या प्रकरणात यापूर्वी सहा आरोपपत्रे दाखल केली होती़ त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि दुबई येथून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी सिंडिकेटसोबत कट रचल्याचा आरोप अनेक आरोपींवर ठेवण्यात आला होता, असे तपासात उघड झाले आहे.
 
अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांचा वापर
या सिंडिकेटचा सूत्रधार वितेश कोसर ऊर्फ राजू दुबई हा एक फरारी आरोपी आहे. तो पाकिस्तानी आयएसआय एजंट आणि अफगाण नागरिकांसोबतही सामील होता. अमली पदार्थांच्या अवैध विक्रीतून मिळालेले ७६ कोटी रुपये हवाला मार्गाने अफगाणिस्तानला पाठवले गेले आणि त्याचा वापर दहशतवादी कारवायांना निधी देण्यासाठी केला गेला, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे़
 
 
हवालामार्फत पैशांचे हस्तांतरण
प्रतिबंधित वस्तूंची तस्करी, हवालामार्फत अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेला पैसा अफगाणिस्तानला हस्तांतरित करणे आणि इतर प्रतिबंधित वस्तूंच्या माध्यमातून एकूण ८९ कोटी रुपये गुन्हेगारीतून मिळाले होते. या प्रक्रियेत गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेची निश्चिती करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. बनीत सिंग तलवार हा हरप्रीत सिंग तलवारचा भाऊ आहे. हरप्रीत सिंग तलवारने सूत्रधार राजू दुबईसोबत मिळून भारतात अमली पदार्थांची तस्करी सुलभ केली. एनआयएच्या प्रकरणात हरप्रीत सिंग तलवारला अटक झाल्यानंतरही बनीत सिंग तलवार त्याच्या नियंत्रणाखालील व्यावसायिक संस्थांचे व्यवस्थापन आणि संचालन करत राहिला, असेही तपासात उघड झाले आहे.