मुंबई
jailer 2 box office बॉक्स ऑफिसवर सध्या दक्षिण भारतीय चित्रपट आणि बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ने दमदार कामगिरी करत जगभरातील कमाईचा ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘रणबाली’च्या कमाईचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांचा ‘प्रहार’, तसेच आदिनाथ कोठारे आणि यामी गौतम यांचा ‘नयी नवेली’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
‘जेलर २’ने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत कमाईचा वेग कायम राखला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी, १७.१५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील त्याची एकूण कमाई ३३४.३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जगभरातील कमाईने ६०० कोटींचा टप्पा पार केल्याने या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड लक्षवेधी ठरली आहे.