मायलेकांना दोन वर्षाचा कारावास

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर

nagpur court किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी रवि काळे यांनी मातेसह दोन मुलांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.
 
 

nagpur court sentences mother and two sons to two years in assault case
मयूर माणिक वंजारी (२८), सौरभ माणिक वंजारी (३०) आणि मालती उर्फ पार्वती माणिक वंजारी (५२) दिलीपनगर, बेझनबाग अशी आरोपींची नावे आहेत.
 
 
जखमी संगीता चुडामन वंजारी (५२) आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. ते एकाच घरात रहात होते. संगीता या वरच्या मजल्यावर, तर आरोपी तळमजल्यावर रहात होते. १५ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास संडासचा पाईप कुणीतरी तोडत असल्याचा आवाज संगीताला आला. गल्लीत जाऊन त्यांनी पाहिले असता आरोपी हे हातोडीने पाईप तोडताना दिसून आले. संगीताने त्यांना हटकले असता आरोपींनी शिवीगाळ करून लोखंडी हातोडीने त्यांच्या डोक्यावर मारून जखमी केले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी ३२६, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.
हवालदार दिलीप वानखेडे यांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात तीनही आरोपींवर गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी काळे यांनी तिघांनाही २ वर्षाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड सुनावला. आरोपीतर्फे अ‍ॅड. एच. डी. कामडे यांनी, तर सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुंदरलाल सावळकर यांनी काम पाहिले.