नागपूर
Noun Conservation Institute मतिमंद विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्यरत संज्ञा संवर्धन संस्थेचा वार्षिकोत्सव रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दक्षिण अंबाझरी मार्गावरील अंध विद्यालयाजवळील मुंडले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला एमएमपी इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अरुण भंडारी आणि रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या कल्पतरू विशेष शाळेतील विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर करणार आहेत.संस्थेचे शुभचिंतक, प्रायोजक, संरक्षक, पालक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सावजी व सचिव डॉ. आर. एम. उत्तरवार यांनी केले आहे.
सौजन्य:सुनील गव्हाणे,संपर्क मित्र