वर्धा
samitis vijayadashami रामायण वाचणार्यांपेक्षा पाहणार्यांची संख्या वाढली आहे. सीता कायम रडत असते अशी तिची प्रतिमा तयार केली गेली. सीता तयार झाली तरच रामाचा अवतार होतो. आजही स्वतंत्र भारतात सीता समजली नाही, हे आमचे दुर्दैव आहे. देशात सामाजिक, सांस्कृतिक षडयंत्र सुरू आहे. नकारात्मक बोलणार्यांची संख्याही वाढते आहे. स्त्रियांवरील हिंसाचार हा व्हायरस आहे, तो उखडून फेकला पाहिजेेे, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम् सीताका यांनी केले.
स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर राष्ट्र सेविका समितीच्या वतीने शनिवार २४ रोजी आयोजित विजयादशमी उत्सवात त्या प्रमुख वता म्हणून बोलत होत्या. यावेळी शारदा मुकबधीर विद्यालयाच्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या उषा फाले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती तर व्यासपीठावर नगर कार्यवाहिका स्मीता पांडे यांची उपस्थिती होती.
सीताका पुढे म्हणाल्या, भारतात महिला सुरक्षित नाहीत असा दुराग्रह तयार केल्या जातो आहे. परंतु, आमच्या शिक्षण पद्धतीतील अभ्यासक्रमात कुठेही महिलांचा आदर करण्याचे शिकवले नसतानाही आजही बसमध्ये वा बसस्थानकावर स्त्रियांना जागा देण्याची परंपरा आहे. जगात नाही तशी स्त्रियांकडे पाहण्याची चांगली दृष्टी आमच्या भारतात असल्याचे सीताका म्हणाल्या. महिला ९ महिने पोटात गर्भ ठेऊन बाळाला जन्म देते तो तिचा पुर्नजन्म असतो. आज विवेकानंद, शिवाजी महाराजांसारखी तेजस्वी मुलं जन्माला घालण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
सीताका पुढे म्हणाल्या की, ३२ वर्षांची विधवा स्त्री मावशी केळकर यांनी डॉ. हेडगेवार यांचे चिंतन समजून महिलांसाठी पुढाकार घेऊन काम सुरू केले. त्याला ९० वर्षे झाली. ध्येय आणि निष्ठेने सुरू केलेले काम आजही अव्याहतपणे सुरू असुन देशात ८५० जिल्ह्यात समितीचे काम सुरू आहे. राष्ट्रभतीसाठी मावशींनी स्वत: झोकून दिले. मिळणे आणि मिळवणे सोपे नाही. देशात सामाजिक संघटना स्त्रियांकरिता काम करतात. परंतु, त्या कुठेतरी कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यत केली.
विश्वाला तेज देण्याची ताकद भारतात आहे. मातृशतीने उद्याच्या पिढीला चांगले विचार देण्याची गरज आहे. डॉ. हेडगेवार आणि मावशींचे स्वप्न साकार करण्याचा हा १०० आणि ९० वर्षांचा प्रवास झाला. त्यांचे विचार पुढच्या पिढीकडे हस्तांतर करण्याचा पासवर्ड देणे गरज आहे. आम्ही यशस्वी मातृत्व देण्यावे काम करू या, असे आवाहन त्यांनी केले. समितीची स्थापना वर्धेत झाल्याने हे शहर गंगोत्री असल्याचा गौरवपुर्ण उल्लेखही त्यांनी केला.
उषा फाले यांनी, आपण महिलांनी केलेले प्रात्यक्षिकं पाहून भारावून गेलो. मावशींनी स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे सांगून स्त्री ही शती असल्याचे त्या म्हणाल्या. सुरुवातीला शस्त्रपूजन, प्रात्यक्षिकं, लेझिम, व्यायाम योग, अमृत योग, वैयतिक गीत सादर केले. प्रास्ताविक व परिचय प्रज्ञा देशमुख यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन वनश्री भुसारी यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील समितीच्या सेविकांसह महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.