टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचे इंदूर कनेक्शन!

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
मुंबई,
Tiger Shroff firing incident मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणात इंदूरमधून २२ वर्षीय इंजिनिअरला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रांजल असे या तरुणाचे नाव असून, तो हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहे. इंदूरमधील परदेशीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखा आणि इंदूर गुन्हे शाखेने संयुक्त मोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले.
 
 
वावरे
 
प्रांजल हा पाच दिवसांपूर्वी आपल्या भावाला भेटण्यासाठी इंदूरला आला होता. त्याचा भाऊ इंदूरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रांजलचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आता मुंबई गुन्हे शाखेचे पथक त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला घेऊन जाणार आहे. टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या या प्रकरणात प्रांजलची चौकशी सुरू आहे. गोळीबारासाठी हत्यारांचा पुरवठा कोणी केला आणि या घटनेमागे काही कट होता का, या महत्त्वाच्या बाबींच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. या चौकशीतून प्रकरणातील आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याकडे तपास यंत्रणांचे लक्ष आहे.