सडक अर्जुनी,
truck-and-trailer-collide तालुक्यातील सौंदड येथील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासमोरील ब्रेकरजवळ आयशर ट्रकला मागून ट्रेलरने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले ही घटना २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रेलर चालकाच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात हलविण्यात आले, तर आयशर ट्रकच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याचेवर सौंदड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (क्रमांक एमएच ४० एके ४०८४) सौंदड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासमोरील ब्रेकरजवळ असताना मागून येणार्या ट्रेलर क्रमांक सीजी १२ बीएच ६१९२ ने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे व त्या ठिकाणी पुरेसी लाईटची व्यवस्था नसल्याने उड्डाणपुलासमोरील ब्रेकरजवळ घडलेल्या या अपघातामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.