वापरलेली इंजेशन्स उघड्यावर फेकली !

पद्मतीर्थ मोक्षधाम परिसरातील धक्कादायक प्रकार

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
वाशीम,
used-injections शहरातील पद्मतीर्थ मोक्षधाम परिसरात वापरलेली इंजेशन्स रस्त्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय कचर्‍याची अशा प्रकारे उघड्यावर विल्हेवाट लावली जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक स्वच्छता आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
 
 
used-injections
 
वापरलेली इंजेशन्स आणि सुया रस्त्यावर फेकल्यामुळे पादचारी, लहान मुले तसेच परिसरातील नागरिकांना इजा होण्याची शयता आहे. वापरलेल्या सुयामुळे टोचण्याची जखम झाल्यास संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा कचर्‍याची सुरक्षित विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे. वैद्यकीय उपचारादरम्यान निर्माण होणार्‍या जैववैद्यकीय कचर्‍याचे संकलन, वर्गीकरण आणि सुरक्षित विल्हेवाट नियमानुसार करणे आवश्यक आहे. मात्र, वापरलेली इंजेशन्स थेट रस्त्यावर फेकली जात असल्यास संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याची शयता आहे. हा कचरा नेमका कोठून आला आणि तो कोणी फेकला, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
 
 
पद्मतीर्थ मोक्षधाम परिसरात आढळलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती किंवा संस्थेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. तसेच रस्त्यावर पडलेली वापरलेली इंजेशन्स सुरक्षितपणे उचलून त्यांची नियमानुसार विल्हेवाट लावावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.या प्रकरणाची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.