भाविकांच्या वाहनाला अपघात १९ जखमी

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
जळगाव
jalgaon accident मध्य प्रदेशात सत्संगासाठी निघालेल्या आदिवासी भाविकांच्या मालवाहू वाहनाला जळगावमध्ये भीषण अपघात झाला. कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ वाहनाचा मागील एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन दोन वेळा उलटले. या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

19 tribal devotees injured in jalgaon accident as cargo vehicle overturns twice 
मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी बांधव मालवाहू वाहनातून मध्य प्रदेशातील सत्संगासाठी जात होते. प्रवासादरम्यान वाहनाच्या मागील चाकाचा एक्सेल तुटल्याने चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे वाहन रस्त्यावर दोनदा पलटी झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे वाहनातील भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. गंभीर जखमींमध्ये एका दहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. किरकोळ जखमी झालेल्या काही जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, धार्मिक यात्रा आणि प्रवचनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना अपघात होण्याच्या घटनांमुळे सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दुसरीकडे,jalgaon accident  मुंबई-नाशिक महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. घोटी टोलनाक्यापासून टाकेघोटीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टोल प्रशासन आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.