कन्यापूजनातून सेवाभावाचा जागर

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
नागपूर ,
Aasman Foundation आसमान फाऊंडेशनतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त बोथली ठाणा येथील माध्यमिक शाळेत कन्यापूजन करण्यात आले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, तर शाळेला क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

203 
 
 
कन्यापूजनाचा विधी फाऊंडेशनच्या डॉ. साधना थोते, मेघा गि-हे आणि शाळेतील महिला शिक्षिकांनी पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा आणि गावागावांतून खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवि गि-हे यांनी शाळेला क्रीडा साहित्य भेट दिले.यावेळी फाऊंडेशनचे सचिव नरेश शेंडे, दिनेश टेकाडे, मुख्याध्यापक सुनील टेकाडे आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
सौजन्य:जयश्री बोबडे,संपर्क मित्र