अकोला
fda action येथील एमआयडीसीत मसाल्याचे उत्पादन करणाऱ्या दोन पेढींवर एफडीएच्या पथकाने शनिवार, २४ रोजी कारवाई करण्यात आली असून एकाचा परवाना निलंबित तर एकाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मसाला उत्पादन करणाऱ्यांना काही दिवसांआधीच निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानुसारअन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने एमआयडीसी फेज तीन मधील कुंभारीजवळील मे.राजकुवर ट्रेडर्स येथे तपासणी केली असता काळा मसाला (सुगरण) धनिया पावडर, दोन्ही अन्न पदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित साठा लेबल दोष असल्याने ३ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या पेढीला व्यवसाय बंद करण्याची एफडीएने नोटीस दिली.तर मे.टोपली अॅण्ड सन्स, एमआयडीसी फेज चार येथे तपासणी करण्यात आली, दरम्यान मिर्ची पावडर, धनीया पावडर, काळा मसाला तसेच काळा मसाला मुस्कान, काळा वाटण मसाला, स्पेशियल कांदा लसून मसाला असा २१० किलो ५२ हजार ५०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.ही कारवाई एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त सचिन केदारे अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त देवानंद वीर, रवींद्र सोळंके व किशोर बोरचाटे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली.
तपासणीत काय आढळले?
वैध अन्न नोंदणी, परवाना, तांत्रिक व्यक्ती नसणे, एफएसएमएस प्लॅन नाही, कामगारांचे मेडिकल प्रमाणपत्र नाही,अन्न पदार्थ्यांचे विश्लेषण अहवाल नाही, पेस्ट कंट्रोल, फिफो, साफसफाई, कच्चे अन्नपदार्थ चा अभिलेख नाही, कामगारांना डोक्यावर कॅप नाही, कच्चे व तयार अन्न पदार्थ जमिनीवर ठेवले आहेत, खिडक्याना बारीक जाळी नाही, पॅकिंग मटेरियल चे फूड ग्रेड प्रमाणपत्र नाही, स्टॉक रजिस्टर नाही या शेड्युल चार च्या विविध नियमांचे उ्लंघन करत असल्याने दिसून आले.