गो-विज्ञानाने जपला अस्सलपणा

राहिन्याच्या भूमिकेमुळे सर्वच अचंबित

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
नागपूर,
rahinya gulhane खोट्याला नेहमीच दिखाव्याची जोड द्यावी लागते. मात्र, जे अस्सल असते, त्याला दिखाऊपणाची गरज भासत नाही. अस्सलपणाचे असेच उदाहरण देवळापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने कामधेनूच्या संदर्भात मांडले आहे. केंद्राने मनापासून जपलेली ही संकल्पना नेमकी कशी उपयुक्त आहे, याची माहिती एका दिवसाच्या सहलीसाठी आलेल्या राहिन्या गुल्हाने या चिमुकलीने दिली. नव्हे, तिने देशी गायी आणि कामधेनूविषयीची माहिती स्वतः अनुभवातून समजून घेतली.
 

go-vigyan centre preserves indigenous cow heritage, rahinya gulhane impresses everyone 
नागपुरातील सेंट व्हिन्सेंट प्लॉटी शाळेची सहल गो-विज्ञान केंद्रात आली होती. या सहलीत आठव्या वर्गातील राहिन्या गुल्हाने सहभागी झाली होती. इतर मुलांप्रमाणे तीही सुरुवातीला निरागस होती. मात्र, सहलीनंतर तिने दिलेल्या माहितीमधून तिच्या अनुभवाची खोली दिसून आली. गो-विज्ञान केंद्राची पाहणी करताना तिने आपल्या सोबत आलेल्या मुलांना गायीचे महत्त्व सोप्या शब्दांत समजावून सांगितले. गायीच्या उपयोगितेविषयी आणि तिच्या संगोपनाविषयी तिने दिलेली माहिती अनेकांसाठी कौतुकाचा विषय ठरली.
 
 
राहिन्याने या मुलीला पाहता गाई खूप आवडतात, हे लक्षात येते. मात्र, नागपुरात सर्वत्र सिमेंटचे जंगल वाढत असल्याने गायी कुठे पाहायला मिळणार, असा प्रश्न तिला पडला होता. त्यामुळे गो-विज्ञान केंद्र पाहण्याची संधी तिला सहलीच्या रूपात मिळाली. या संधीचे सोने करत तिने संपूर्ण केंद्र पाहिले आणि गायींचे संगोपन, देशी गायींची उपयुक्तता तसेच कामधेनूचे महत्त्व याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तिने सोप्या शब्दांत इतर मुलांपर्यंत पोहोचवली.
 
 
ऑक्सिटोसिनचे दूध टाळा
 
गायींचे अधिक दूध मिळावे, या उद्देशाने  rahinya gulhane  काही गोपालक ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देतात. मात्र, अशा प्रकारे मिळणारे दूध मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. या दुधामुळे पोटाचे विकार, मळमळ आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती राहिन्या गुल्हाने हिने दिली. याशिवाय शेणापासून गणरायाची मूर्ती, शेणखत आणि गोवऱ्यांचा वापर करून तयार होणाऱ्या वस्तूंचे महत्त्वही तिने सांगितले. गाईंचे आरोग्य जपणे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचेही तिने नमूद केले.
 
 
काही तासांच्या सहलीत एवढी माहिती देणाऱ्या या चिमुकलीचे कौतुक गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष परमेश गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी केले. गो-विज्ञान केंद्राने नैसर्गिकपणा जपत देशी गायी किती उपयुक्त आहेत, हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकतरी केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन राहिन्याने केले. तिच्या या अनुभवातून गायींचे महत्त्व, त्यांचे संगोपन आणि नैसर्गिक जीवनपद्धती यांविषयीची जाणीव मुलांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश मिळतो.