मुंबई
govinda बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचा ‘रूपा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला, तरी त्याआधीच त्याच्या वैवाहिक नात्यातील वाद समोर आले आहेत. पत्नी सुनीता आहुजा हिने गोविंदावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केल्याची चर्चा असून, तिने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता. मात्र, नंतर हा अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत गोविंदाचे नाव जोडले जात आहे. दोघे अनेकदा एकत्र दिसल्याने या चर्चांना अधिक उधाण आले. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गोविंदा कोमल राणीसोबत पोहोचला होता, तर सुनीता आहुजा स्वतंत्रपणे दर्शनासाठी गेली होती. या घडामोडींमुळे गोविंदाला टीकेलाही सामोरे जावे लागले.
पत्नीच्या आरोपांवर यापूर्वी फारसे भाष्य न करणाऱ्या गोविंदाने आता आपल्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सुनीता जे काही करत आहे, ते मुलांच्या हितासाठी करत असल्याचे त्याने म्हटले. सुनीता हे आपले पहिले प्रेम असल्याचे सांगतानाच प्रेमासारख्या भावनांशी खेळणे योग्य नसल्याचेही त्याने नमूद केले.
यावेळी गोविंदाने govinda त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा निर्माण झाल्याचा दावा केला. मात्र, या व्यक्तीचे नाव त्याने जाहीर केले नाही. त्यामुळे त्याच्या या विधानानंतर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.सुनीता आहुजाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याच्या मुद्द्यावरही गोविंदाने आपली भूमिका मांडली. हा निर्णय सुनीताने घेतला होता आणि तिला तो घ्यायचा होता, असे त्याने सांगितले. मात्र, घटस्फोटाबाबत बोलताना त्याने आपण हिंदू असल्याचा आणि परंपरेचा उल्लेख केला. त्याच्या वक्तव्यावरून सुनीतासोबत घटस्फोट घेण्याची त्याची इच्छा नसल्याचे संकेत मिळतात.गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील तणावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता गोविंदाने प्रथमच जाहीरपणे प्रतिक्रिया दिल्याने या प्रकरणाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. तथापि, तिसऱ्या व्यक्तीबाबतचा त्याचा दावा आणि वैवाहिक नात्याविषयीची भूमिका याबाबत अधिक स्पष्टता येणे बाकी आहे.