अल्पवयीन मुलाच्या भरधाव मर्सिडीजच्या वृद्धाचा मृत्यू

केरळमधील न्यायाधीशांच्या मुलावर गंभीर आरोप

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
चेरानेल्लोर,
केरळमधील चेरानेल्लोर परिसरात रविवारी पहाटे एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला. एका अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाने चालवलेल्या भरधाव मर्सिडीज-बेंझ कारने एका स्कूटरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती काम संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की स्कूटरचा चक्काचूर झाला आणि त्यावरील सामान रस्त्यावर विखुरले गेले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
 
 
 
6767987089
अपघाताच्या वेळी ती मर्सिडीज-बेंझ कार न्यायाधीशांच्याच नावावर नोंदणीकृत असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात स्पष्ट केले आहे. पीडित कुटुंबाने आरोप केला आहे की, अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिल्याबद्दल पोलिसांत जाब विचारला असता न्यायाधीशांनी त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे संवाद साधला. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे. पीडित कुटुंबाने याविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्धार केला आहे.