मातृशक्ती ही राष्ट्राची आधारशक्ती : प्रांत सेवाप्रमुख माणिकताई कद्रे

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
वाशीम,
vijayadashami मातृशक्ती कुटुंब घडविते, कुटुंबाने समाज घडतो आणि समाज राष्ट्र निर्माण करतो. मातृत्वाची ताकद अफाट आहे. ती ओळखा, स्वबोध होऊ द्या आणि स्वदेह, स्वआरोग्य, स्वमन, स्वचारित्र्य, स्वपरिवार, स्वभाषा, स्वदेश, स्वसंस्कृती या सर्व स्व चे संरक्षण करण्यास देवी अष्टभुजेचा आशीर्वाद घेऊन सिद्ध व्हा, असा संदेश प्रांत सेवाप्रमुख माणिकताई कद्रे यांनी आपल्या भाषणातून दिला. राष्ट्र सेविका समिती वाशीमच्या विजयादशमी उत्सवानिमित्त त्या उपस्थितांना संबोधित करीत होत्या.
 

matrushakti is the foundation of the nation, says maniktai kadre at washim vijayadashami celebration 
कार्यक्रमास मातोश्री वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रांजली पाध्ये अध्यक्षस्थानी होत्या. तर नगर कार्यवाहिका सुनिताताई कोरान्ने व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी बालसेविकांनी मनोरे, लेझीम, डंबेल्सची मनोहारी प्रात्यक्षिके सादर केली. गृहिणी सेविकांनी टाळनृत्य सादर केले. सुचिता देशमुख यांनी सुमधुर वैयक्तिक गीत सादर केले, प्रमिला सरनाईक, संध्याताई अनसिंगकर, रोहिणी होले, आरती बावने यांनी श्लोक, अमृतवचन, सुविचार व प्रार्थना म्हटली. प्रास्ताविक व परिचय सुनीताताई कोरान्ने यांनी करून दिला. कार्यक्रमाचे शेवट प्रीती काटेकर यांनी वंदे मातरम गीतांनी केला. उत्सवाआधी शहरातून पथसंचलनही काढण्यात आले होते. पथसंचलन मुख्य संघस्थान येथून निघून शिवाजी महाराज चौक, जुने नगर परिषद, दंडे चौक, गणेश पेठ मार्गे पुन्हा संघ स्थानावर पोहोचले.