सीए रोडवर आगीचे तांडव

गीतांजली टॉकीजसमोर आग

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
नागपूर,

nagpur-ca-road-shop-fireशहराच्या मध्यवर्ती भागातील सी. ए. रोड, लोधीपुरा, गीतांजली टॉकीजसमोर असलेल्या दुकानाला आज रविवारी सकाळी भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. गंजीपेठ अग्निशमन केंद्राच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
 

aag 
गंजीपेठ अग्निशमन केंद्राला सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी पीबीएक्सवरून ऑपरेटर चाटे यांचा कॉल आला की, गीतांजली टॉकीजसमोर दुकानात मोठी आग लागली आहे. कॉल मिळताच क्षणाचाही विलंब न करता एमएच ३१, डीएस ४९२७ आणि एमएच ३१ एफसी २८२६ या दोन फायर गाड्या रवाना झाल्या आणि अवघ्या ४ मिनिटांत म्हणजे ८.५१ वाजता घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन प्रमुख विलास तिळगुळे, प्रमुख अग्नी विमोचक विजवे, चालक आत्माराम जाधव, दिनेश खडसे, फिरोज चौधरी, सफाई कर्मचारी विनायक मेश्राम यांच्यासह सिव्हिल, लकडगंज, वाठोडा, सक्करदरा, सुगतनगर केंद्राच्या जवानांनी संयुक्तरीत्या आग विझवली.