'ऑपरेशन सिंदूर'ने सिद्ध केली वायुसेनेची शक्ती!

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Operation Sindoor proved the might of the Air Force 'भारतीय हवाई दलप्रमुख ए. पी. सिंह यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, पश्चिमी मोर्चेवर १,२०० किलोमीटरची रुंदी आणि २०० किलोमीटरच्या खोलीपर्यंत करण्यात आलेल्या अचूक हल्ल्यांनी हे सिद्ध केले आहे की हवाई दलाच्या पोहोच बाहेर कोणतेही लक्ष्य नाही. 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत त्यांनी हा पाकिस्तानसाठी एक कठोर संदेश असल्याचे अधोरेखित केले आणि हा मोहीम म्हणजे हवाई दलाच्या क्षमता-केंद्रित रणनीतीच्या प्रभावीपणाचा पुरावा असल्याचे सांगितले. चार दिवस चाललेल्या या ऑपरेशनची पाहणी करणारे हवाई दलप्रमुख म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी हवाई शक्ती निर्णायक भूमिका बजावते आणि हे देशाकडून प्रत्युत्तर देण्याचे मुख्य माध्यम असण्यासोबतच एक सामरिक प्रतिबंधक देखील आहे.
 

erf ७ ९  
 
या मोहिमेदरम्यान स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या कामगिरीचे कौतुक करताना ए. पी. सिंह यांनी सांगितले की, अनेक स्वदेशी शस्त्रांनी असाधारण कामगिरी करत शत्रूचे मोठे नुकसान केले आहे. क्षमता-केंद्रित सैन्य दल अशा प्रकारच्या कारवाईसाठी अधिक सक्षम असते, कारण त्यांच्याकडे कोणत्याही एका साधनावर अवलंबून राहण्याऐवजी अनेक पर्याय उपलब्ध असतात. याच लवचिकतेमुळे आपल्याला गरजेनुसार प्रत्युत्तर नियंत्रित ठेवण्यास आणि तणाव वाढण्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी मे महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करण्यात आले होते. याद्वारे पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब््यातील क्षेत्रांतील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले होते. १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामानंतरची ही भारताची सर्वात महत्त्वाची सीमापार लष्करी कारवाई मानली जाते.
 
 
या मोहिमेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत दिलेले भाषण आणि 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल केलेले दावे चर्चेत आले होते, तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही शाहबाज शरीफ यांचे भाषण शेअर केले होते. 'ऑपरेशन सिंदूर'ने आपण निवडलेला मार्ग योग्य असल्याचे सिद्ध केले असून, हवाई दल याच दिशेने अधिक दृढ निश्चयाने पुढे जाईल, असे ए. पी. सिंह यांनी सांगितले. भविष्यात जेव्हा केव्हा देश हाक मारेल, तेव्हा भारतीय हवाई दल देशाच्या अटींवर अधिक वेगाने, अचूकतेने आणि निर्णायक क्षमतेने प्रत्युत्तर देण्यास सज्ज असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.