‘रामायण’मध्ये रावणासाठी शरद केळकरचा दमदार आवाज

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
मुंबई
sharad kelkar आपल्या दमदार आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता शरद केळकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘बाहुबली’ चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला हिंदी आवाज देऊन प्रेक्षकांची मने जिंकणारा शरद केळकर आता बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात रावणासाठी आवाज देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका अभिनेता यश साकारत असून, त्याच्या भूमिकेला शरदच्या दमदार आवाजाची जोड मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
 
 
sharad kelkar

‘रामायण’मध्ये तगडी स्टारकास्ट
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार असून, या भव्य चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
चित्रपटाच्या कलाकारांबरोबरच त्यातील आवाजांची निवडही चर्चेचा विषय ठरत आहे. रावणाच्या भूमिकेसाठी यशचा अभिनय आणि शरद केळकरचा भारदस्त आवाज यांची सांगड प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरू शकते.