नागपूर,
third pay revision appel to gadkari‘ऑल युनियन्स अँड असोसिएशन्स ऑफ बीएसएनएल’च्या प्रतिनिधिमंडळाने आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. कार्यकारी व अकार्यकारी कर्मचाऱ्यांच्या तृतीय वेतन सुधारणा प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळून त्याची अमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी निवेदन सादर केले.
बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी तृतीय वेतन सुधारणा १ जानेवारी २०१७ पासून देय आहे. मात्र, जवळपास नऊ वर्षे उलटूनही कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. या दीर्घ विलंबाबद्दल एयूएबीने चिंता व्यक्त केली. वेतन सुधारणेच्या अमलबजावणीत होत असलेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल व कार्यक्षमता यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या विषयात हस्तक्षेप करून हा मुद्दा पंतप्रधान, केंद्रीय संचार मंत्री व केंद्रीय अर्थमंत्री यांच्यासमोर मांडावा,
तृतीय वेतन सुधारणेला लवकर मंजुरी मिळवून त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती प्रतिनिधी मंडळाने गडकरी यांना केली. पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी प्रतिनिधी मंडळाला दिली.
एसएनईचे जिल्हा सचिव सुनीत उपाध्याय, जिल्हाध्यक्ष पंकज भुजबळ, संघटन सचिव दीपक कुलकर्णी, एनएफटीईचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश नायडू, जिल्हा सचिव हरेंद्र पांडे, सर्कल खजिनदार संतोष सुरपाटणे, विदर्भ संयुक्त सचिव सौरभ डांगरे आदी उपस्थित होते.