वर्धा,
overtake चिनी मातीचे विद्युत उपरणे घेऊन नागपूर येथून हैदराबादच्या दिशेने जात असलेला ट्रक ओव्हरटेकच्या नादात अनियंत्रित होत दुभाजकावर चढला. ही घटना २५ रोजी जाम-नागपूर मार्गावरील शेडगाव परिसरात झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम. पी. ०६ झेड. एल. ९८५४ क्रमांकाचा ट्रक चिनी मातीचे विद्युत उपकरणे घेऊन नागपूर येथून हैदराबादच्या दिशेने जात होता. भरधाव ट्रक शेडगाव भागातील भारत पेट्रोलपंप समोर आला असता चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच भरधाव ट्रक रस्ता दुभाजकावर चढून उलटला. यात चालक चंद्रप्रकाश महावार (२६) रा. मध्यप्रदेश याला किरकोळ दुखापत झाली. तर क्लिनर दीपेंद्रसिंह महावीर (१८) रा. मध्यप्रदेश हा थोडक्यात बचावला. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमीला रुग्णालयाकडे रवाना करीत रस्ता मोकळा करण्याचे काम केले.