संस्कारक्षम कुटुंबातूनच सामर्थ्यशाली राष्ट्राची निर्मिती: अरुणजी नेटके

वाशीम येथे विजयादशमी उत्सव उत्साहात

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
वाशीम,
arunji netke हा देश परम् वैभवाला न्यायचा आहे. याच उद्देशाने संघाच काम अहोरात्र सुरू आहे. हा देश हिंदूचा असल्याने हाा देश हिंदू राष्ट्र आहे. एक सनातनी राष्ट्र आहे. जगामधील अनेक संस्कृती संपल्या. परंतु, सनातन ही मिटणारी हस्ती नाही. हा देवांचा देश आहे. जन्म घेण्यसाठी देवही भारताचीच निवड करतात. एक तासाची संघशाखा नित्य सिध्द शक्ती आहे. समाजाच्या हृदयस्थानी संघशाखा आहे. या ठिकाणी त्याग, समर्पण आणि समाजाच्या उत्थानाची शिक्षा दिली जाते. हे ईश्वरी कार्य आहे, असे स्पष्ट धोरण प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहीजे. आज देशामध्ये प्रत्येक घर तोडण्याच काम बाह्य शक्ती करीत आहे. त्यामुळे घर सुरक्षीत तर राष्ट्र सुरक्षीत हा मंत्र प्रत्येकाने जपला पाहिजे, असे प्रतिपादन विहिंपचे केंद्रीय सहमंत्री अरुणजी नेटके यांनी वाशीम येथे रा. स्व. संघाच्या जिल्हा क्रिडा संकुलामध्ये झालेल्या विजयादशमी उत्सवामध्ये केले.
 

arunji netke 
 
यावेळी व्यासपठावर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश राठोड, प्रमुख वक्ते म्हणून विहिंपचे केंद्रीय संहमंत्री अरुणजी नेटके, जिल्हा संघचालक शंकरराव ढोबळे, तालुका संघचालक नारायणराव जाधव व नगर संघचालक दिपकराव जहागीरदार उपस्थित होते. अरुणजी नेटके पूढे म्हणाले की, समाज घडविण्यामागे संस्काराच सामर्थ सर्वाधिक आहे. त्यासाठी आपले आचरण दुसर्‍याने आदर्श घेण्यासारखे असले पाहिजे. संस्कारीत मुलेच या देशाच भविष्य आहे. त्यासाठी लहानपणी त्यांच्या मनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, सेवालाल महाराज, गुरुगोविंदसिंह व ईश्वरांची शिकवण द्या. संस्काराविना निर्माण होणारी युवापिढी चारित्र्यावान होऊच शकत नाही. त्यांच्यावर आपल्याच घरामध्ये संस्कार करावे लागेल. त्यासाठी हिंदू आचरण हेच सर्व अवगुणांना उत्तर आहे. भ्रष्टाचार शिकविणारी शाळा भारतामध्ये कोठेच नाही. भ्रष्टाचाराचा उगम आपल्याच घरामधुन होत आहे. त्याचा उगम हा लहान मुलांचा वाढदिवस साजरा होत असतांना भेटवस्तुमध्ये आहे. या भेटवस्तुमुळे लहानपणीच त्यांच्या अंगी घेण्याची वृत्ती बळावते. आणि आयुष्यभर ती कायम राहते. त्याकरीता आपला मुलगा घेणार नाही, तर देणारा घडवा. त्याला हिंदू बनवा. जगामधील सर्वाधिक मोठी लोकशाही असलेला हा आपला देश आहे. या देशात जर सत्तातरण करायचे असेल तर ते लोकतांत्रिक पध्दतीनेच केल्या गेल पाहिजे.arunji netke संविधानाच पालन, कायद्याच पालन केल्या गेले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्हाला केवळ राजकीय स्वातंत्र नको आहे. आम्हाला सामाजिक स्वातंत्र पाहिजे. ती येणार आहे, समता आणि बंधुत्व या भावानेमधुन हे तत्व आमच्यात रुजल पाहिजे. ज्यांना हे मान्य नसेल ते उग्र आंदोलने करतील अस डॉ. बाबासाहेबांनी म्हटले आहे. देशामध्ये भविष्यात अराजकतेचे जागरण मांडल्या जाईल. देशामध्ये तीन महिन्यापासून हे सुरूही झाल आहे. त्यांना रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या नागरी कर्तव्याच पालन केल पाहीजे, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी प्रमुख अतिथी सुरेश राठोड म्हणाले की, संघ हा आपल्या देशाला समृध्द करण्यासाठी काम करतो. या देशाला आज संघ कार्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी ते वाढले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शस्त्रपुजन, ध्वजारोहण, सांघिक गीत, योग, प्रात्याक्षिक, सुभाषीत व वैयक्तीक गीत झाले.