अल्बानिया,
albania-tirana-violent-protestsसध्या भारतासह जगातील इतरही काही देशांत मोठी आंदोलनं केली जात आहेत. काही देशातील आंदोलनांमुळे तर आणीबाणीची स्थिती निर्माण झालीय. फ्रान्स देशात अशीच काही स्थिती असताना आता अल्बानिया या देशातही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. अल्बानियाची राजधानी तिराना या शहरात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनातील आंदोलकांनी थेट पोलिसांवर हल्ला केलाय. या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून या देशात सत्ताबदल होतो की काय? तेथील पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो की काय? असे गंभीर प्रश्न विचारले जातायत.

अल्बानिया देशाची तिराना ही राजधानी सध्या धगधगत आहे. येथे आंदोलक रस्त्यावर उतरले असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. या आंदोलनाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच कृषी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारालाच आग लावून दिली. चिघळलेल्या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच रबरी गोळ्यांचा वापर करून गोळीबार केला. आंदोलकांवर पाण्याचाही मारा करण्यात आला.
अल्बानियातील लोकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष निर्माण झालाय. भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी याच्याविरोधात तेथे विद्यार्थ्यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीनंतर या आंदोलनाला धार चढली. तिराना तसेच अल्बानिया देशाच्या अन्य शहरात आंदोलनाचे हे लोण पसरले. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार आंदोलकांनी अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांचा राजीनामा मागितला आहे. आंदोलकांनी शासकीय इमारती आणि बँकांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता या देशात नेमके काय होणार? हे पाहणे मत्त्वाचे ठऱणार आहे.