500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी!

एसआयटी स्थापन,आयपी एस शैलेश बलकवडे तपास करणार

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
मुंबई
500-crore-audio-clip मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राज्यात राजकीय वाद पेटला असतानाच आता या प्रकरणी अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawde) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय एसआयटीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
 
cm sit
या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करून त्यामागील सूत्रधारांचा चेहरा समोर आणावा, अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली होती.
 
त्रिस्तरीय समिती करणार चौकशी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्रिस्तरीय एसआयटीची स्थापना केली आहे. या समितीची संपूर्ण जबाबदारी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
अध्यक्ष: शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त)

सदस्य: विजयकांत सागर (पोलीस उपायुक्त)

सदस्य: बजरंग बनसोडे (पोलीस उपायुक्त)
ईडी चौकशीची मागणी; भाजपचा पलटवार
दुसऱ्या बाजूला या 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बवरून राजकीय आरोपांचा खेळ तीव्र झाला आहे. या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ED) किंवा अधिक मोठ्या केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. तर दुसरीकडे, ही ऑडिओ क्लिप पूर्णपणे एआय जनरेटेड असून संजय राऊत यांचीच कसून चौकशी झाली पाहिजे, असा पलटवार भाजपने केला आहे. आता एसआयटीच्या फॉरेन्सिक तपासात नक्की काय सत्य बाहेर येते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.