अनिल कांबळे
नागपूर,
obscene photos इंटरनेट आणि सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांशी संबंधित अश्लील साहित्य डाउनलोड करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी रोनीत ऊर्फ नीतेश शेंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) या संस्थेच्या सायबर टिपलाइन अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन माध्यमांवर बनावट नावाचा वापर करून स्वतःची ओळख लपविली होती.

मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या माध्यमातून तो अल्पवयीन मुलांशी संबंधित अश्लील व लैंगिक शोषणाची सामग्री डाउनलोड करून शेअर करत असल्याचे तांत्रिक अहवालातून समोर आले. इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठादार कंपन्यांकडून मिळालेल्या डिजिटल माहितीच्या आधारे एनसीएमईसीने ६ मे रोजी सायबर टिपलाइन अहवाल जारी केला होता.obscene photos त्यानंतर इमामवाडा पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा (पोक्सो) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करून या प्रकारात तो किती काळापासून सक्रिय होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.