बुलडाणा
e-kyc शासनाच्या सूचनेनुसार रेशन कार्ड धारकांनी आपले ई केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावे, अन्यथा आपले रेशनचे धान्य बंद होईल असे आवाहन बुलडाणा पुरवठा निरीक्षण अधिकारी नीलिमा उरकुडे यांनी केले आहे.
सेवा संकल्प अभियान अंतर्गत जनतेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. शासनाने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसी बंधनकारक केले आहे. अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही ई केवायसी केलेले नाही. ज्या नागरिकांनी ई केवायसी केले नाही, त्यांचे धान्य वितरण पुढील महिन्यापासून बंद होण्याची शयता आहे. त्यामुळे सर्व रेशन कार्ड धारकांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन किंवा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधून आधार कार्ड लिंक करून ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत दुकानात जाऊनच ई केवायसी करावे. या अभियानात पुरवठा विभागाचे कर्मचारी नागरिकांना सहकार्य करणार आहेत. या सेवा संकल्प अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी आपले ई केवायसी पूर्ण केले आहे. असेही पुरवठा निरीक्षक अधिकारी निलीम उरकूडे यांनी सांगितले आहे.