शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी आ. संजय गायकवाड सचिवपदी अनिल म्हस्के यांची निवड

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
बुलढाणा
mla-sanjay-gaikwad बुलढाण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा समितीचे सामाजिक कार्य अधिक गतीने सुरू आहे. शिवस्मारक समितीत फेरबदल केले असून अध्यक्षपदी आ. संजय गायकवाड तसेच समितीचे सचिव म्हणून पुण्यनगरीचे अकोला आवृत्तीप्रमुख अनिल म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी डॉ. विकास बाहेकर निवड झाली आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांची निवड एकमताने २६ ऑटोबरच्या बैठकीत करण्यात आली. शिवस्मारकात आई तुळजाभवानीची मूर्ती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या समितीने तातडीने घेतला.
 

mla
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आई तुळजाभवानीच्या श्रद्धेला असलेले महत्त्व लक्षात घेता, या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मूर्ती स्थापनेच्या ठरावामुळे शिवस्मारकाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वात आणखी भर पडणार आहे. शिवस्मारक परिसरातील दुकानांचा वापर कोणत्या व्यवसायांसाठी व्हावा, याबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण भूमिका घेण्यात आली. स्मारकातील दुकाने हॉटेल व्यावसायिक किंवा फळविक्रेत्यांना न देता झेरॉस सेंटर, कार्यालये आणि जनरल स्टोअर्स यांसारख्या व्यवसायांना देण्यात यावीत, असा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीला महेश बिडवे, राजेश हेलगे, उमेश शर्मा, भारत शेळके, मिलिंद देशपांडे, अशोक इंगळे, सुरेश चौधरी, मिर्झा बेग, हरीश निर्मळ, सुनील उदयकर, रणजीत राजपूत, जालिंधर बुधवत उपस्थित होते.