नगरसेवक मोटघरेवर गोळीबार करणाऱ्या फल्लीला अटक

फल्ली रामेश्वरममधून ताब्यात : गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
corporator motghare भांडेवाडी परिसरातील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करणारा मुख्य आरोपी विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम शहरातून ताब्यात घेण्यात आले असून उद्या सोमवारी नागपुरात आणण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे युनीट पाचच्या पथकाने तांत्रिक तपास करीत फल्लीचा शोध घेतला. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ ने फल्लीसह त्याच्या टोळीतील सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे.
 

sdfsetewt 
 
टोळीचा कथित सूत्रधार विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याने नगरसेवकाच्या घरावर गोळीबार करण्यासाठी साथीदारांना सुपारी दिली होती. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह दाखल असलेल्या गुन्ह्यात मकोकाची कलमे ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) जोडण्यात आली आहेत. या प्रकरणातील सात आरोपी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत, तर टोळीचा सूत्रधार फल्ली गुप्ता याच्यासह अन्य चार आरोपी फरार झाले होते. शुभम मोटघरे (३१, रा. श्रावणनगर, भांडेवाडी) हे काँग्रेसचे प्रभाग क्रमांक २६ मधील नगरसेवक आहेत. २६ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.४२ वाजताच्या सुमारास ते घराच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये गेले होते. गॅलरीतील काच फुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता खंडवानी टाउन रोडवरून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने दुचाकीवरून दोन तरुण जाताना दिसले. त्यातील मागे बसलेल्या तरुणाने नगरसेवकाच्या घराच्या गॅलरीच्या दिशेने गोळी झाडल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. गोळी गॅलरीच्या कठड्यावरील काचेला लागल्याने तिला छिद्र पडले आणि काचेचे तुकडे परिसरात विखुरले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून भांडेवाडी पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
अखेर फल्ली सापडला
पोलिसांनी अंकुश झनक तोमरकर (३०), ऋषभ ऊर्फ ऋषी विशाल नागदेवे (२४), अमित मधुकर ठाकरे (२२), कार्तिक बबलू तोमरकर, ऋषभ भगवती पेथेल (३०), केतन दुर्गाप्रसाद माटे (२४) आणि रोमित ऊर्फ फुल्ल्या मुनेश्वर वाहाणे (२१) या सात आरोपींना अटक केली. विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याच्यासह अशोक ऊर्फ बाबा यादव, सहेली पंधरम ऊर्फ सोनू आणि अनिकेत ऊर्फ अन्नू संजय बिहारे हे चार आरोपी अद्याप फरार होते.corporator motghare फल्ली तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम शहरात लपून बसला होता. त्याला रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नागपुराकडे रवाना झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक ५ चे पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या पथकाने केली