तुकाराम मुंढेंच्या FDAचा दणका!

बुलडाण्यात १ कोटींच्या मसाल्यांवर छापा

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
बुलडाणा,
tukaram-munde-fda-masala-raidआगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासन विभाग अलर्ट मोडवर असून नियमित खाद्यपदार्थांसह आता अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा मसाला व्यावसायिकांकडे वळला आहे. बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाने देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे दोन बड्या व्यवसायिकांच्या आस्थापनांवर धाड टाकून एक कोटी रुपयांच्यावर मसाला जप्त केला आहे. तर दोन व्यवसायिकांच्या आस्थापनांचा परवाना निलंबित केला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथील मे. जनता सेवा मिरची मसाला इंडस्ट्रीज व मे. अनोखे फुड्स अँड स्पाइसेस या मसाला उत्पादक आस्थापनेवर कारवाई केली आहे.
 
 
mundey
दरम्यान, या दोन्ही आस्थापनेच्या तपासणीत अस्वच्छता, मांजर, कबुतरे व कीटकांचा वावर, कीटक नियंत्रणाचा अभाव, कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव, अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवणे, तसेच अन्नपदार्थांच्या चाचणीचा अहवाल अभाव अशा मोठ्या त्रुटी आढळून आल्यात. परिणामी आता FDAचा मोर्चा मसाला व्यवसायिकांकडे वळाल्याचे चित्र असून अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईने आता मसाला व्यवसायिकांचेही धाबे दणाणले आहेत.
 
तर एमआयडीसी परिसरातील पाबळे नमकीन या फरसाण उत्पादन करणाऱ्या आस्थापनावर अचानक छापा टाकण्यात आला यावेळी अन्न व सुरक्षा नियमांचे डबे उल्लंघन असल्याचे निदर्शनास आले. अयोग्य साठवणूक, उघड्यावर साचलेला कचरा, तळलेल्या तेलाची खालवलेली गुणवत्ता अशा अनेक त्रुटी आढळल्या. यामुळे प्रशासनाने इथून नमकीन, शेव, पापडी यासह पाच नमुने घेतले. तर 1422 किलो आणि 1 लाख 32 हजार 940 रुपये किमतीचा साठा जप्त करत अन्न परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन आणि विक्रीस मनाई करण्यात आली.