१४ वर्षीय मुलगी साडेपाच महिन्यांची गर्भवती

तपासणीत धक्कादायक प्रकार उघड; सीताबर्डी पोलिसांकडून गुन्हा दाखल

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
POCSO Case अवघे १४ वर्षे वय असलेल्या मुलीला एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती साडेपाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पंकज (२१) या तरुणाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
 

14-Year-Old Girl Found 22 Weeks Pregnant, POCSO Case Registered in Nagpur 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलीची पंकजशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. छावणी परिसरातील जवाहर कॉन्व्हेंट कॉलेजसमोरील इंदिरा वसाहतीत एका वसतिगृहाजवळील मोकळ्या भूखंडावर हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो रुग्णालय) दाखल केले. तेथे करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत ती २२ आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित तरतुदींसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.