उ. रा. गिरी स्मृती कविसंमेलनात कवितांचा बहारदार आविष्कार

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
नागपूर,
u r giri memorial poets gathering विदर्भ साहित्य संघ आणि आर. एस. मुंडले कला, वाणिज्य महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी धरमपेठ येथील आर. एस. मुंडले महाविद्यालयात ‘कविवर्य उ. रा. गिरी स्मृती’ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कविसंमेलनात विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण करत कवींनी रसिकांना साहित्यिक मेजवानी दिली.
 
 
u r giri memorial poets
 
 
कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष बाळ कुलकर्णी, अरुणा सबाने, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, प्रा. विनोद जीवनतारे, आणि आर. एस. मुंडले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री सरदेशपांडे उपस्थित होते. कविसंमेलनात डॉ. श्यामल सराडकर यांनी ‘कोणते मी नाव देऊ’ ही कविता सादर केली. प्रसन्न शेंबेकर यांनी ‘मनाच्या मर्मबंधाचा’ ही गझल सादर केली. चित्रा कहाते यांनी ‘सभेत चालण्याची फुले वेचतांना’ ही कविता सादर केली, तर प्रा. अशोक काळे यांनी ‘झाड आणि वृक्ष’ या कवितेतून माणसातील अहंकार, संकुचित वृत्ती आणि स्वार्थीपणावर भाष्य केले. माणूस स्वतःच्याच कोषात अडकून केवळ वस्तू जमवण्यात मग्न होतो, हा आशय या कवितेतून व्यक्त झाला.
वर्षा थोटे यांनी स्त्रियांच्या जीवनातील परिस्थितीवर भाष्य करणारी ‘माफक इच्छा’ ही कविता सादर केली. वृंदा जोगळेकर यांनी ‘पाऊस होणं’ या कवितेतून निसर्गाशी एकरूप होण्याची भावना तर डॉ. सुनंदा जुलमे यांनी ‘कितीही दिवसांनी पुन्हा’ या कवितेतून दोन बहिणींमध्ये वाद झाल्यानंतरही कायम राहणाऱ्या प्रेमाचे भावपूर्ण चित्रण केले. प्रा. विनोद जिवनतारे यांनी ‘तो माझा बाप होता’ ही कविता सादर केली.u r giri memorial poets gathering  याशिवाय विजय राठोड, माया रंभाळे-पराते, राजू रामचंद्र डहाके, रमेश बेलगे, सुहास काकडे, शितल बोंडे, विद्या डोनटकर, प्रकाश गोंडे, स्मिता काळीकर, विजय वा साडे, चंद्रकांत वझलवार, विद्या निनावे, देवमन कामडी, हितेश गोमासे, राहुल गवस, वैशाली धनविजय, प्रज्ञा निनावे, ज्योत्स्ना दोनाडकर आणि गोपाल मापारी आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
शुभदा फडणवीस यांनी प्रास्ताविक केले.