पहिल्या फेरीत किरण सरनाईक आघाडीवर

श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक
 
अमरावती,
kiran-sarnaik अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार किरण रामराव सरनाईक यांनी पहिल्या पसंतीचे ३ हजार ९०३ मते मिळवत आघाडी घेतली आहे. शिवसेना बंडखोर डॉ. श्रीकांत गोविंद देशपांडे २ हजार २०९ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिक्षक भरतीचे सुरेश देवकर यांना १ हजार ५८२ मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 
 
kiran-sarnaik
 
पहिल्या फेरीत एकूण १४ हजार पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये १३ हजार ७०५ मते वैध, तर २९५ मते अवैध ठरली. उमेदवारांना मिळालेल्या मतांनुसार काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे यांना १ हजार ३१९, शिवसेना उबाठाचे दत्तात्रय श्रीराम लहाने यांना १ हजार १६९, दिलीप कडू यांना ८५७ आणि डॉ. सौ. संगीता सचिंद्र शिंदे (बोंडे) यांना ६९८ मते मिळाली.
 
 
डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघ्ने यांना ५१२, चंद्रशेखर भोयर यांना ४३२, डॉ. अविनाश बोर्डे यांना ४१४ आणि गजानन रामचंद्र उल्हे (पाटील) यांना ४१० मते मिळाली. चौधरी किरण अर्जुन यांना ११६, हुशे संतोष श्रीकृष्ण यांना २४, कडू विनोद प्रल्हाद यांना १०, ढोके गजानन गोविंदराव यांना ९ आणि डॉ. सुमित सुरेशराव पवार यांना ७ मते मिळाली.
 
 
प्रा. ब्राह्मणे मिलिंद तुकाराम आणि राजेशकुमार शालिग्राम कड यांना प्रत्येकी ५ मते, तर प्रा. अनिल मधुकरराव काळे, अशोक वामन हिवाळे आणि उपेंद्र बाबाराव पाटील यांना प्रत्येकी ४ मते मिळाली. आशिष मनोहर अंबुलकर, पवार किरण अर्जुन आणि रामदास संपतराव काटक यांना प्रत्येकी ३ मते मिळाली. हेमलता दिलीपसिंग मुनोत यांना २, तर श्रीकृष्ण सूर्यभान पहुरकर यांना १ मत मिळाले. पहिल्या पसंतीच्या पहिल्या फेरीच्या १४ हजाराच्या मतमोजणीत सरनाईक यांनी स्पष्ट आघाडी घेतली असून, पुढील मतमोजणी आणि अंतिम निकालाकडे शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.