नागपूर
nagpur earthquake tremors उपराजधानी नागपूरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज दुपारी अचानकपणे नागपूर शहरामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यामुळे काही काळ जमीन हादरून गेली होती. यावेळी नागपूरकरांची काहीवेळ भंबेरी उडाली. पण सुदैवाने भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे असल्याने कोणतेही संकट शहरावर आलेले नाही.
नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुपारी साधारण ३ वाजण्याच्या सुमारास नागपूर शहरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागलेय रिश्टर स्केलवर हा भूकंप ३.० इतक्या तीव्रतेचा होता, अशी नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, यावेळी नागपूरच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशीही माहिती समोर येत आहे की, जमिनीखाली ८ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर या भूकंपाचे केंद्र असू शकते. पण याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.