लग्नाच्या खरेदीसाठी नागपुरात आलेल्या तरुणाच्या कारची काच फोडून १.३२ लाखांचा ऐवज लंपास

सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील घटना; तहसील पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
नागपूर
Nagpur Theft Car लग्नाच्या खरेदीसाठी नागपुरात आलेल्या बल्लारपूर येथील तरुणाच्या कारची काच फोडून चोरट्याने एक लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील कपड्यांच्या दुकानाजवळ घडली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
 

Nagpur Theft Car 
पराग अशोक शेंडे (रा. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) हे मारुती सुझुकी कारने लग्नाच्या खरेदीसाठी नागपुरात आले होते. त्यांनी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील एका कपड्यांच्या दुकानाजवळ कार उभी करून लॉक केली आणि खरेदीसाठी दुकानात गेले. यावेळी कारमध्ये ठेवलेल्या काळ्या बॅगेत एक लाख रुपये रोख, पाकिटात सात हजार रुपये, बँकेची कार्डे आणि २५ हजार रुपये किमतीचा टॅबलेट असा ऐवज होता.
खरेदी करून Nagpur Theft Car  परतल्यानंतर शेंडे यांना कारची काच फुटलेली दिसली. कारची तपासणी केली असता आतील रोकड, टॅबलेट आणि अन्य साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.