समुद्रपूर
accident नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील आजदा पाटीवर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक बाबाराव मुंगल, वय ७० वर्षे, रा. आजदा जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला.
बाबाराव मुंगल एम. एच. ३२-ए. झेड. ८९४० क्रमांकाच्या मोपेड वाहनाने समुद्रपूरवरून आजदा येथे जात होते. दरम्यान, आजदापाटीवर वळण घेत असताना नागपूरकडून येणाऱ्या एन.एल. ०१ ए. एफ. ६९१९ क्रमांकाच्या ट्रकने स्कूटीला धडक दिली. त्यामध्ये बाबाराव मुंगल रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर त्यांचा सहकारी प्रकाश मांडवकर गंभीर जखमी झाला. महामार्ग रुग्णवाहिकेने जखमींना समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांनी प्राथमिक उपचार करून त्याला सेवाग्राम येथे रवाना केले. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मोहतुरे करीत आहे.