मुंबई,
pm kisan पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित होणार असल्याचे वृत्त आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये थेट जमा होणार आहेत. मात्र, महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा आणि दहावा हप्ता अद्याप प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष या निधीकडे लागले आहे. दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांकडून नमो योजनेचे चार हजार रुपये दिवाळीपूर्वी मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांत एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. २४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे, बँक खाते आधारशी जोडणे आणि ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. संबंधित अटींची पूर्तता केलेल्या पात्र लाभार्थ्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ८९.४८ लाख शेतकऱ्यांना या हप्त्याच्या माध्यमातून एकूण १ हजार ७९६ कोटी रुपयांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नववे आणि दहावे हप्ते अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. हे दोन्ही हप्ते वितरित करण्यासाठी सुमारे ३ हजार ७०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. या निधीच्या मंजुरीसाठी मार्च आणि जुलै महिन्यात प्रस्ताव पाठवण्यात आले होते; मात्र, त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याची माहिती आहे.
त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये ३० ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.pm kisan सध्या या योजनेच्या निधी वितरणाबाबत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे नमो योजनेचे दोन्ही हप्ते दिवाळीपूर्वी मिळतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये, नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये आणि दुष्काळी मदतीचे पाच हजार रुपये अशी एकूण ११ हजार रुपयांची मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळू शकतो. मात्र, नमो योजनेच्या हप्त्यांबाबत अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.