वाशीम,
additional-district-collector जिल्ह्यातील संभाव्य् दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जलस्रोतांमधून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. याचाच एक भाग म्हणून कारंजा तालुयातील अंतरखेड व कामरगाव येथे २७ ऑटोबर रोजी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष आढावा बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये उपलब्ध जलसाठ्यांचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. दुष्काळी छायेत असलेल्या या भागात उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याच्या सूचना श्री.पाटील यांनी दिल्या. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याचे संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अवैध पाणी उपसा करणार्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आणि तो रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
पाणीटंचाईच्या या कठीण काळात प्रशासनासोबतच ग्रामस्थांनीही समन्वयाने आणि पुढाकाराने काम करण्याचे आवाहन त्यावेळी पाटील यांनी केले. यावेळी कारंजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पुनम राणे, नायब तहसीलदार विनोद हरणे यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.